Ad will apear here
Next
पुनःप्रत्ययाचा आनंद देणारं ‘पडद्यामागचं गाणं’
हिंदी आणि मराठी चित्रपटगीतांच्या अगदी १९४०पासून ते आजच्या काळाचा विचार करता, अक्षरशः लाखो उत्तमोत्तम गाणी तयार झाली आहेत आणि त्यातली हजारो उत्तम प्रकारे चित्रितही झालेली आहेत. इतक्या प्रचंड मोठ्या कालखंडातून आणि खजिन्यातून अजित साने-सोनाले यांनी त्यांच्या आवडीची पन्नास गाणी निवडून त्यांचं रसग्रहण करून, ‘पडद्यामागचं गाणं’ या पुस्तकातून वाचकांसमोर मांडलंय. त्या पुस्तकाचा हा परिचय...
........................
मानवाची खरंच कमाल आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने आपल्या मनाला रिझवणारं संगीत निसर्गाच्या विविध आविष्कारांतून अचूक उचललं. पक्ष्यांच्या किलबिलाटातून, अवखळ झऱ्याच्या नृत्यातून, सागराच्या गाजेतून आणि घोड्याच्या टापांतूनसुद्धा! आणि मग आपल्या बुद्धिमत्तेच्याच जोरावर तऱ्हेतऱ्हेची वाद्यं निर्माण करून त्यातून अद्भुत संगीत तयार केलं आणि मग त्या संगीताला आणखी अर्थवाही बनवण्यासाठी आपल्या प्रतिभेने त्यात शब्दांची जान ओतली. कधी मंत्रमुग्ध करणारी अतीव गोड चाल, तर कधी उठून नाचायला लावणाऱ्या ठेक्याचा ताल, कधी अत्यंत मधुर आवाजांच्या गायक-गायिकेच्या गळ्यांतून छेडलेल्या अद्भुत तानांनी वेड लावणारी चाल, तर कधी कवीच्या/ गीतकाराच्या काळजात रुतणाऱ्या शब्दांनीच साधलेला जादुई परिणाम – आणि यातूनच मग पिढ्यानपिढ्या आपल्या हृदयात कायमची जाऊन बसलेली अगणित बेमिसाल गाणी! विशेषतः मराठी मानसाचा विचार केला तर शेकडो मराठी गाण्यांबरोबरच मनांत घर करून बसलेली हजारो हिंदी गाणी! 

पूर्वी टीव्ही किंवा मुबलक सिनेमे बघण्याची सोय नसताना रेडिओ हेच गाणी ऐकण्याचं प्रमुख साधन होतं आणि त्यामुळे गाणी ऐकताना जो तो आपापल्या कल्पनाशक्तीनुसार त्या गाण्यांत रममाण व्हायचा; पण टीव्ही आणि सिनेमा थिएटर्सची संख्या वाढल्यावर त्या गाण्याचं चित्रीकरण प्रत्यक्ष दिसायला लागल्यावर त्यातला वेगळा ‘मझा’ समजायला लागला. गीतकार, संगीतकार आणि गायकांच्या मेहनतीला पडद्यावर साकार करताना कोरिओग्राफर, फोटोग्राफर, दिग्दर्शक आणि मुख्य म्हणजे गाणं पडद्यावर म्हणणाऱ्या हिरो-हिरॉइन्सनी त्या गाण्याला दिलेला न्याय याने एक वेगळाच आविष्कार प्रेक्षकांना मुग्ध करून गेला. आणि मग अशी हजारो गाणी लोकांच्या आयुष्याचा भाग झाली. काही मंडळींना अशा गाण्यांचं अचूक रसग्रहण किंवा मर्म उलगडून दाखवण्याचं कसब साधता आलं आणि त्यातलंच एक आश्वासक नाव म्हणजे अजिता साने-सोनाले!

हिंदी आणि मराठी गाण्यांच्या अगदी १९४० पासून ते आजच्या काळाचा विचार करता अक्षरशः लाखो उत्तमोत्तम गाणी तयार झाली आहेत आणि त्यातली हजारो उत्तम प्रकारे चित्रितही झालेली आहेत. इतक्या प्रचंड मोठ्या कालखंडातून आणि खजिन्यातून अजित साने-सोनाले यांनी त्यांच्या आवडीची पन्नास गाणी निवडून, त्यांचं रसग्रहण करून ‘पडद्यामागचं गाणं’ या पुस्तकाच्या रूपाने ते वाचकांसमोर मांडलंय.

गाणं तयार होताना त्यामागे कितीकांची मेहनत असते, तरीही कित्येक गाणी फसतात. कधी योग्य स्वर आणि चाल मिळूनही ते नेमकेपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्यात पडद्यावरचे कलाकार कमी पडतात, तर कधी स्वर, चाल, समर्थ कलाकार मिळूनही कॅमेऱ्यामागचे डोळे तितके जाणकार किंवा तयारीचे नसल्यामुळे गाणं फसतं! अजिता साने-सोनाले यांनी त्यांच्या आवडीची पन्नास गाणी आणि त्यांमागचं सौंदर्य उलगडून दाखवताना य सर्वच बाजूंना न्याय देऊन गीतकाराचं शब्दातलं सौंदर्य, गीताचा भावार्थ, गाण्याच्या टेकिंगची कमाल, गीताची पार्श्वभूमी, सेटिंग आणि कॅमेऱ्याची जादू अशा सर्व अंगांनी गाण्याचं रसग्रहण केलंय.
अवश्य वाचावं असं हे पुस्तक! 

ही पन्नास गाणी माहीत असणाऱ्या सर्वांना त्या गाण्यांच्या जादूचा पुनःप्रत्यय देईल आणि ही गाणी पाहिलेली नसलेल्या सर्वांना (असे कोणी असलेच तर) एक नवी दृष्टी देईल!! 
  
पुस्तक : पडद्यामागचं गाणं 
लेखिका : अजिता साने-सोनाले 
प्रकाशक : राज असरोंडकर, माणूस प्रकाशन, त्रिवेणीनगर, उल्हासनगर, जि. ठाणे - ४२१००४ 
पृष्ठे : १२० 
मूल्य : १६० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZUFBK
Similar Posts
नियतीचे प्रतिबिंब हातावरच्या रेषा, उंचवटे, बांधणी, स्पर्श, रंग, हाताचा आकार, तळहातावर असणाऱ्या विविध आकृत्या (फुल्या, चांदणी, साखळी, मत्स्य, डाग), बोटांची कमी-जास्त लांबी, एकमेकींना छेडणाऱ्या रेषा, रेषांचे वळसे या सर्वांचा आपल्या शरीर प्रकृतीशी, प्रारब्धाशी असणारा संबंध यातून प्रत्येक केस कशी हाताळली आणि हस्तरेषांचा अभ्यास
झुंज श्वासाशी आजारी माणसाला उपचाराच्या शेवटच्या टप्प्यांत ऑक्सिजनची गरज भासते; पण ज्याचे हॉस्पिटलमधले प्राथमिक उपचारच ऑक्सिजन घेऊन सुरू होत असतील त्याच्या आयुष्याची शाश्वती किती कठीण? ज्याला वयाच्या १६व्या वर्षीच त्यापुढचा प्रत्येक दिवस ‘बोनस’ असणार आहे, हे कळलं असेल, त्याच्या मनाची घालमेल इतरांना कशी कळावी? मुकुल
प्रोग्रामिंग इन ‘सी’ ‘प्रोग्रामिंग इन सी फ्रॉम नॉव्हिस टू एक्स्पर्ट’ हे महेश भावे आणि सुनील पाटेकर यांनी लिहिलेलं आटोपशीर, पण ‘सी प्रोग्रामिंग’विषयी सर्व माहिती अत्यंत सुलभतेने देणारं पुस्तक आहे. नवशिक्यांपासून तज्ज्ञांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा या पुस्तकाविषयी...
निवडणुकीसाठी बिनमहत्त्वाच्या गोष्टी देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या, जिव्हाळ्याच्या आणि गंभीर प्रश्नांकडे अत्यंत वस्तुनिष्ठपणे पाहत, त्याविषयीचे आपले परखड विचार आणि मते ठोसपणे मांडणाऱ्या आणि वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या ३० वैचारिक लेखांचे ‘निवडणुकीसाठी बिनमहत्त्वाच्या गोष्टी’ असे वेगळ्या धाटणीचे शीर्षक असलेले पुस्तक अजय महाजन यांनी आपल्यासमोर आणले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language